- पोलिसांच्या गुन्हे शाखा एकची कारवाई; तरूणाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी हा पोलिसांच्या आदेशाचा भंग करून शहरात आला. तसेच त्याने आपल्याजवळ एक लोखंडी कोयता बाळगला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्याचा मनाई आदेश असताना आरोपीने पोलीसांच्या आदेशाचा भंग केला. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा एकला माहिती मिळाली.
त्यांनी (दि. १) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास साईनाथ हॉस्पीटल समोर, आदर्शनगर, मोशी भोसरी येथे कारवाई करून आरोपीला जेरबंद केले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २८४ / २०२३ शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण कुमार जाधव (वय २६ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळील टेकडीवर, लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.















