न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवड येथील श्री. शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे निमित्त साधून विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब जाधव आणि संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने शिशुवर्ग ते १२ वीच्या ३००० विद्यार्थ्यांना महाभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील तुकडी ७ क आणि १० क च्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना भारतीय बैठकीत वाढून त्यांना भोजनाचा आस्वाद मिळवून दिला. यावेळी संस्थाप्रमुख अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदिश जाधव, संचालक विजय जाधव सर, संचालक अमित बच्छाव सर, यांनी स्वतःउपस्थित राहून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.
















