- वीजजोडणीसाठी आर्थिक मागणी झाल्यास थेट संपर्क साधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) जाधववाडी, सेक्टर १२ येथील प्रकल्पात लाभार्थ्यांना परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू असून भोसरीगाव येथील शाखा कार्यालयामध्ये विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरीगाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले
भोसरीगाव येथील शाखा कार्यालयात नवीन वीजजोडणीच्या कामासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे आणखी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाने दिली असून, ज्या लाभार्थ्यांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल. त्यांनी केवळ आवश्यक कागदपत्रांसह भोसरीगाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














