- भोसरी पोलीसांकडून तरूणाला अटक; मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- गांजा बाळगुन गावठी हातभट्टीपासुन बनावट देशी दारू तयार करण्याऱ्यास भोसरी पोलीसांनी अटक केली आहे.
भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला माहिती मिळाली की, आरोपीने पांच बंगला, एस.टी. रोड, दापोडी परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला आहे. त्या ठिकाणी भोसरी पोलीसांनी पाच बंगला, एस.टी. रोड, दापोडी, पुणे येथील पी.डब्ल्यू.डी.च्या स्टिल यार्डयेथे जावुन खात्री केली. त्यावेळी एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो तेथील पडक्या रूममध्ये शिरला त्यावेळी पोलीसांनी त्याला चौहुबाजुनी घेरून तो लपुन बसलेल्या खोलीत जावुन तो आरोपीला ताब्यात घेतले.
ओमकार महादेव लिंगे (वय २५ वर्षे, रा. पाच बंगला, घर नं.११, एस.टी. रोड, दापोडी), असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलोसांनी त्यावेळी त्याची व तो थांबलेल्या खोलीची झडती घेतली असता ९ किलो ६२२ ग्रॅम वजानाचा गांजा, २३६० देशी दारू टँगो पंचच्या बाटल्या, ९०० मोकळ्या बाटल्या, लेबले व बाटल्याची झाकणे, १४० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली.
पोलीसांनी एकुण ३,५५,५४१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडे तपास केला असता तो गावठी हातभट्टीची दारू मोकळ्या बाटलीमध्ये भरून त्याला लेबल व सिल लावुन ती बनावट देशी दारू टँगो पंच नावाने विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ विवेक पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, संजय चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन गारडे, मच्छिंद्र बांबळे, राजेंद्र राठोड, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, संतोष महाडीक, मार्तंड बांगर, स्वामी नरवडे, महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील यांनी केली आहे.














