न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- वारंवार फिर्यादी तरुणीच्या व्हाटसअपवर आरोपीने फोन केला. कॉलेज सुटल्यानंतर शाळेच्या गेटवर येऊन फिर्यादीचा हात पकडुन तिला जवळ ओढले. तिला अश्लिल शिवीगाळ केली. पुढे जावुन फिर्यादी सोबत भांडण करुन तिला हाताने मारहान केली. फिर्यादी ज्या बसमधुन जात होती, त्या बसच्या मागे जावुन फिर्यादीच्या घराजवळ येवुन फिर्यादीचा पाठलाग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३) रोजी सकाळी ११.०० वाजता डी.वाय. पाटील आर्ट कॉमर्स कॉलेजसमोर गेटवर घडला. महिला फिर्यादीने आरोपी विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ६९४/२०२३ भादवि कलम ३५४,३५४ (ड), ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.