- निगडी पोलिसांकडून महिलेला त्रास देणाऱ्या ‘मजनू’ला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- ‘तु माझ्यासोबत बोलणे टाळत आहे, तु बोलली नाही तर, मी तुला जीमच्या बाहेर आल्यावर पाहुन घेईन’, असे म्हणत आरोपीने महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांना थांबवुन रोडवर ‘तु माझी पोलीस तक्रार का केली आहे?’ असे म्हणत फिर्यादीचा हात मुरगळुन डाव्या कानावर, मानेवर जोराजोराने थापड-बुक्कीने मारहाण केली. घटनेबाबत कोणाला सांगितले तर फिर्यादीला व कुटूंबाला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मारूती मंदीर येथून दर्शन करून घरी परत येत असता आरोपीने त्याच्या दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादीच्या घराच्या गेटच्या समोर येऊन फिर्यादीचा हात पकडुन ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहु शकत नाही’, असे बोलून आरोपीने अश्लिल वर्तन केल्याने फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली.
‘तु जर माझी झाली नाही तर मी तुला व तुझ्या पतीस पाहुन घेईन’ अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली. तसेच आरोपीने फिर्यादीच्या मोबाईवर वेळोवेळी वाईट मॅसेजेस केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार जानेवारी २०२३ पासुन ते दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत प्राधिकरण-निगडी येथील शाळेसमोर घडली. महिला फिर्यादीने आरोपी जुनेद शेख (वय अंदाजे ३६ वर्षे, रा. दत्तवाडी, आकुर्डी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३९६/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३५४(४), २९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केईत आरोपीला अटक केली आहे.