न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- भाजीपाला विकत आणण्यासाठी फिर्यादीचे वडील फिर्यादीच्या रिक्षाने चाकण येथे येत असतात. दरम्यान फिर्यादीचे वडील पहाटे घरातून निघाल्यानंतर पहाटे ०४.०० च्या सुमारास नाणेकरवाडी येथील एचपी गॅस एजन्सी जवळ आले.
ते चालवत असलेली रीक्षा ही भरधाव वेगात असल्यामुळे रस्त्याच्या कडेला डीवायडरवर पाठीमागील टायर आदळले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीच्या डाव्या बाजुचे पाठीमागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. गाडीच्या डाव्या दरवाज्यामध्ये अडकल्याने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त येवुन ते बेशुध्द झाले. स्वत:च्या मरणास व रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बादशाह कासीम शेख (वय ५८ वर्षे रा. वाल्हेकरवाडी, साठे कॉलनी, चिंचवडेनगर) असे मयताचे नाव आहे. कासीम बादशाह शेख यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी ५८२/२०२३ भा.दं.वि. कलम ३०४(अ), २७९, ३३७,३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.