- वाकडमध्ये तरुणाची तीस लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- व्हॉटसअॅप वर अनोळखी नंबरवरुन फिर्यादीला एका व्यक्तीने “तुम्ही पार्ट टाईम काम करुन दिवसातुन १५० रु ते ८००० रुपये कमाऊ शकता,” असा मेसेज पाठवला. गुगल मॅप लोकेशनमध्ये रिव्युद्वारे पैसे कमावण्याचे अमिष दाखवले. तसेच टेलीग्राम अकाऊंटवर जॉईन होण्यास सांगुन एका व्यक्तीशी ओळख करुन देऊन एक व्हेरिफिकेशन कोड देऊन टेलीग्राम अकाऊंटवर एका चॅनेलला जॉईन करण्यास सांगितले.
‘दिवसभरातुन तुम्हाला १५ व्हिडीओ टाक्स व ५ पर्सनल मर्चंट टास्क येतील, त्या टास्क तुम्ही गुगल मॅपवर लोकेशनवर जाऊन रिव्हयु दयायच्या आहेत. त्या प्रत्येक रिव्हयुचे तुम्हाला ५० रुपये मिळतील. परंतु, १५० रुपये झाल्यानंतरच आपण ते पैसे काढु शकता’, असे सांगुन त्यांना टास्क जादा परताव्याचे अप्रामाणीकपणे अमिष दाखवुन टास्कचा खेळ खेळण्यास भाग पाडले. आरोपींनी फियादी यांची फसवणुक करण्याच्या इरादयाने सर्वांनी टास्कच्या खेळात संगनमताने सहभागी होऊन फिर्यादीला वेळोवेळी जास्तीच्या परताव्याचे अमिष दाखवून ऑनलाईन टेलीग्राम तसेच ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांना ऑनलाईन टास्क पाठवुन त्यांच्यासोबत ऑनलाईन स्वरुपात संभाषण करुन फिर्यादीकडुन ऑनलाईन स्वरुपात एकुण ३०,३५,४०० रुपये एवढी रक्कम ऑनलाईन स्वरुपात घेऊन त्यांची फसवणुक केली. घेतलेली रक्कम फिर्यादीस परत न देता ती स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता वापरुन तीचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०२/०६/२०२३ पासुन दि. ११/०६/२०२३ पर्यंत) फिर्यादीच्या मोबाईल फोनव्दारे घडली. फिर्यादी विनय विजय अग्रवाल (वय ३५ वर्षे, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी आरोपी Carax006, Nikika001, Ayla, Manish 741147, Jyoti661133, Lora, Looney004 (पूर्ण नाव पत्ते माहिती नाहीत), Icici bank A/C no. 778605500066 खाते धारक, Punjab national back A/C No. 9339002100000052 खाते धारक, Icici bank A/C no. 429005500157 खाते धारक, बनावट टेलीग्राम खाते धारक तसेच पेटीएम खाते धारक, लिंक मोबाईल धारक व रक्कम पुढे ट्रान्सफर झालेले बँक खातेधारक ८४३२९२८४२६० मोबाईल धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ६३९/२०२३, भादंवि कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी) ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.