न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. फिर्यादीची आई ही एकटी घरात असताना तिच्या डोक्यामध्ये स्टिलच्या बत्याने तसेच चाकुने शरीरावर वार केला. अज्ञात कारणावरुन तीचा खुन केला आहे.
ही घटना (दि. ६) रोजी सकाळी ११.१५ ते ११.४५ वाजेच्या सुमारास रुपीनगर, तळवडेत घडली. फिर्यादी पोपट जगन्नाथ आमटे (रा. रुपीनगर, तळवडे) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.