न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- किराणा दुकानातुन उधारीवर आरोपींनी किराणा नेला. फिर्यादी हे दोघा आरोपींकडे त्याचे पैसे मागण्यासाठी गेले होते. दरम्यान आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण केली. सह आरोपीने फरशी पुसायचं लाकडी दांडक आणि स्टीलच्या पाईपने फिर्यादीच्या डाव्या आणि उजव्या पायावर मारून फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ६) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मारुंजी ता. मुळशी जि. पुणे येथे घडला. फिर्यादी प्रविण घीसाराम चौधरी (रा. क्रिष्णा अर्पाटमेंट, मदरसन कंपनीसमोर, मांरुजी) यांनी आरोपी अमोल सुभाष मोहोड, नलेश सुभाष मोहोड (दोघेही राहणार मांगीर बाबा चौक, नेरे, दत्तवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ७७४ / २०२३ भा.द.वि. कलम ३२३,३२४,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला सी.आर.पी.सी. ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस दिली आहे.