न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायण व तयार गावठी हातभट्टी दारु हा प्रोव्हीबीशन माल जवळ बाळगुन हातभटटी दारुची भट्टी अनाधिकाराने, विनापरवाना, बेकायदेशीर लावली.
पोलिसांच्या निदर्शनास प्रकार येताच कारवाई करीत १०,००,००० रुपयांचे २०,००० लिटर कच्चे रसायण व तयार गावठी हातभटटी दारु ७१० लिटर एकुण ७१,००० रुपये किंमतीची असा एकुण १०,७१,००० रुपये किंमतीचा माल जप्त केला.
ही कारवाई पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट-३ ने (दि. ६) रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास चिंबळी गावाजवळील लोखंडी वस्ती, येथील इंद्रायणी नदीच्या कडेला ता. खेड जि. पुणे येथे केली.
गणेश मन्नावत, दया चौधरी (रा दोघेही. मोशी ता. हवेली) या दोघा आरोपींवर आळंदी पोलीस ठाण्यात १६७/२०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















