न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- बँकेतुन रक्कम काढण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या हॉटेलमध्ये नेमणुकीस असलेल्या आरोपी कॅप्टनकडे विश्वासाने धनादेश सुपूर्द केला. तो दिलेला धनादेश हा आरोपीने अॅक्सीस बँकेमध्ये वटवला.
त्याद्वारे मिळालेली रक्कम रुपये ७०,००० रुपये काढुन ती रक्कम फिर्यादीकडे आणुन न देता, आरोपीने त्याच्या स्वतःच्या अर्थिक फायद्याकरीता पैशांचा अपहार केला आहे. हा प्रकार (दि. ६) रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान पिंपळे सौदागर येथील हॉटेल तत्व आणि अॅक्सीस बँकेमध्ये घडला.
फिर्यादी अभिमन्यु संपत विनोदे (रा. विनोदेनगर, वाकड) यांनी आरोपी राहुल रतन प्रमाणीक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३१६/ २०२३ भा.द.वि. कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.














