- रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- हिंजवडी थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सागर गोरख बारणे यांचे कार्य कौतुकास्पद असून ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी सागर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले.
सागर बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सागर यांच्या जनसंपर्क कार्यालय आणि महा आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.
सागर बारणे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात आज सागर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरासाठी थेरगाव परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग लाभला असून पुढील भविष्यात ही त्यांनी अशाच प्रकारे सामाजिक कार्य सहभाग घ्यावा आणि गोरगरिबांना न्याय द्यावा असे मत यावेळी खासदार यांनी बोलून दाखवले.
सागर बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या महा आरोग्य शिबिरामध्ये 200 ते 300 लोकांनी सहभाग घेऊन तसेच शंभर ते दीडशे लोकांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, विश्वजीत बारणे, सामाजिक कार्यकर्ते सागर गोरख बारणे, काळूराम बारणे, निलेश बारणे, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, मनीषा पवार, संतोष बारणे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मी माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमी सामाजिक कार्य करत असतो. या वाढदिवसाच्या वेळी मी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. तसेच थेरगाव हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करून मी माझा वाढदिवस साजरा केला. – सागर बारणे (सामाजिक कार्यकर्ते)…














