न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- बोलण्यासाठी फिर्यादीने आरोपींना फोन दिला. तो परत मागीतला. त्या कारणावरुन आरोपी दोघांनी लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले.
ही घटना (दि. ७) रोजी रात्री २.०० च्या सुमारास विठ्ठलनगर येथील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये, पिंपरी येथे घडली. फिर्यादी शुभम राम माने (वय २५ वर्षे, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी आरोपी चिराग गायकवाड (वय अदांजे २० वर्षे, राहणार नेहरुनगर, पिंपरी), शुभम साबळे (वय अंदाजे २० वर्षे, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ७०१/२०२३ भा.द.वि. कलम ३०७,५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम४ (२७), महा.पो.अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.