न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- डॉमीनोजची फ्रेंचायजी देतो, असे म्हणुन आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी यांची १,००,५१,००० रुपयांची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. ९/०६/२०२३ ते दि.०६/०७/२०२३) रोजी दुपारी १२.३० वाजता एम.आय.डी.सी. भोसरी येथे घडली. फिर्यादी दिपक शर्मा यांनी आरोपी निपुन मित्तल, प्रकाश सिंग (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २९१/२०२३ भादवि कलम ४१९, ४२०,३४ माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) (ड) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.