न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- भारत मॅट्रीमोनी या साईडवर लग्नासाठी फिर्यादी मुलगी पाहत होते. त्या साईडवर आरोपी महिलेने फिर्यादिला लग्नाचे आमिष दाखवले. ‘आपले भविष्य उज्वल व्हावे यासाठी आपण @Blescoins2 या ट्रेडिंगवर पैसे गुंतवणुक करुन त्यामधुन रक्कम तयार झाल्यावर चांगले लग्न करू या’, असे सांगितले.
आरोपी महिलेच्या सांगण्याप्रमाणे @Blescoins2 यावर पैसे गुंतविण्यासाठी फिर्यादीने एच.डी.एफ.सी. बॅक मुख्य शाखा, पुणे यांच्याकडुन १५ लाख रुपये वैयक्तीक कर्ज व आयडीएफसी बँक, मुख्य शाखा, पुणे यांच्याकडुन १५ लाख रुपये कर्ज, बजाज फायनान्स, मुख्य शाखा, पुणे यांच्याकडुन २३ लाख रुपये कर्ज अॅक्सीस बँक, मुख्य शाखा, पुणे यांच्याकडुन १५ लाख रुपये क्रेडबी मोबाईलन लोन अँप यांच्याकडुन तीन लाख असे सर्व मिळून ७१ लाख व फिर्यादीकडील १५ लाख रुपये, असे मिळुन एच.डी.एफ.सी बँक, देहुरोड शाखा येथील अंकाऊटवरुन वेळोवेळी ८६,००,००० रुपये गुंतविले. परंतु फिर्यादीचे पैसे परत मिळण्यासाठी फिर्यादीला आरोपीने पुन्हा दहा लाख रुपये @Blescoins2 यावर भरावे लागतील, असे सांगीतले. म्हणुन रक्कम मिळवण्यासाठी फिर्यादीने ca bhaagyashreerthakar यावर पुन्हा ३,९५,००० रुपये व the_uncoventiional_ca यावर १,८०,००० रुपये गुंतवले. आरोपी महिलेने फिर्यादीकडुन एकुण ९१,७५,००० रुपये एवढी रक्कम घेवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १४/०२/२०२३ ते दि.१६/०६/२०२३) दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी देहूरोड येथे घडली. फिर्यादी अमर बाबुराव घोडके (वय ३३ वर्ष, रा. देहुरोड) यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात ३५७/२०२३ भादवि कलम ४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अघि क.६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.