न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- दुकानातील कामगारासह फिर्यादी आणि त्यांचे भाऊ दुकानाची साफसफाई करीत होते. त्यावेळी यातील दोघे आरोपी हे एका दुचाकीवरून आले. दुकाना समोरच लघवी करु लागले. त्यावेळी दुकानासमोर लघवी करु नका, असे फिर्यादी त्यांना म्हणाले. ‘तु आम्हाला दम देतो का,’ असे म्हणुन आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तुला दाखवितो, असे म्हणुन ते तेथुन निघुन गेले. त्यानंतर आरोपी यांनी आणखी दोघांना आणून फिर्यादी यांना शिवीगाळ करीत दुकानाच्या काचेच्या काऊंटरची लाकडी दांडक्याने तोडफोड केली.
आरोपीने दुकानाच्या काऊंटरजवळ जावुन काऊंटरमधील २५०० रूपये रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली. दुकानाच्या बाहेर लावलेली फिर्यादी यांची अॅक्टीव्हा मोपेड गाडीची व फिर्यादी यांच्या गाडीशेजारी लावलेल्या स्प्लेन्डरची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. तसेच दुकानाच्या बाजुला असलेल्या जर्मन बेकरीच्या बाहेर ठेवलेल्या झाडाच्या कुंडयांची लाकडी दांडक्याने तोडफोड करून नुकसान केले, असे फिर्यादी म्हटले आहे.
फिर्यादी रईस मुकीम खान (वय २७ वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. नेहरूनगर पिंपरी) यांनी आरोपी रोहन मानिक जाधव (वय अंदाजे १८ वर्ष), अतुल काळुराम शिंदे (वय अंदाजे २१ वर्ष), किरण मंगेश बिरादर (वय अंदाजे २१ वर्ष), पवन ससाने (वय अंदाजे २० वर्ष सर्व रा. गांधीनगर पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ७०२ / २०२३ भा.दं.वि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ४२७,३४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.