न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- व्होल्ड मल्टीट्रेड प्रा. लि. या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणुक रक्कमेच्या १० टक्के रक्कमेचा तीस महिने परतावा मिळेल, असा विश्वास दर्शवुन सह आरोपीच्या माध्यमातुन आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी व अन्य साक्षीदार यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा ३० महिण्यात १० टक्के परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली एकुण १७,७२,४७३ रुपये मुद्दल रक्कम परत न देता फिर्यादी यांचा विश्वासघात करुन त्यांनी गुंतविलेल्या रक्कमेचा अपहार करुन आरोपीने सह आरोपीशी संगणमत करीत फिर्यादीसह इतरांची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. जुन २०१८ ते २०/०१/२०२२) या कालावधीत हॉटेल सिट्रस थरमॅक्स चौक, चिंचवड व डोंबीवली मुंबई याठिकाणी घडला. फिर्यादी राजेंद्र आनंदराव पाटील (वय ४६ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. स्वप्नपुर्ती अपार्टमेंट, वाघेरे कॉलनी नं. ३, बी. विंग, फ्लॅट नं. २०४, पिंपरी) यांनी आरोपी राजेश उमाशंकर सिंग ऊर्फ राजेश कश्यप (वय अं. ५२ वर्ष रा. मित्रता को ऑप हौ.सो. समतानगर, साई मंदिराजवळ, रेमंड कंपणीसमोर, ठाणे (ईस्ट), प्रदिप शशिकांत गांगुर्डे (वय अं. ४४ वर्ष, रा. पवारनगर, ठाणे ईस्ट) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ४०४/२०२३ भा.दं.वि कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.