- कोणाची फसवणुक झालेली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली असून ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी कमलेश पंढरीनाथ गंगावने व त्यांच्या इतर सहकाऱ्यांची वेळोवेळी टेक्नालॉजी एस.ए.पी. एम. एम कंपनी व एम के मैनेजमेंट सर्व्हिस नावाने जॉबचे अॅड देणाऱ्या कंपनीचे मालक महेशकुमार कोळी व कंन्सल्टन्सी ओनर कल्पना मारुती बखाळ, सुरज महाले, रा-चंदननगर, पुणे, श्रावण शिंदे यांनी मिळुन फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदाराना अनुदिप शर्मा पशुपती, याचे ई पैवेलिन कंपनी खराडी, पुणे व बेक्यू सॉफ्टवेअर सिस्टम्स प्राव्हेट लिमिटेड विमाननगर येथे बनावट आयटी कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवुन ६० ते ७० मुला-मुलींची एकुण ५० लाख रुपये फोन पे गुगल पे व चेक व्दारे वेळोवेळी स्विकारून अस्तित्व नसलेल्या बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपार्टमेंट लेटर) देवुन आर्थिक फसवणुक व विश्वास घात केला. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ५३६/२०२३ भादवि कलम ४१५.४२०.४०६ ४६५४६७४६८४७१ प्रमाणे गुन्हा नोंद होता.
सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व पोलिसांनी गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे यांना करण्याचे आदेशित केले होते. तेव्हा गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास तात्काळ सुरु करून शिताफीने पिंपरी चिंचवड परिसरातुन आरोपी महेशकुमार हरिचंद्र कोली, वय-३२ वर्षे ५५ सुखनिवास सोसायटी, लडकत पेट्रोलपंपा जवळ, सोमवार पेठ, पुणे, अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा, वय ५२ वर्षे, रा-लेन नंबर-१२ श्री राम पी. जी. जवळ, कानदवे नगर, वाघोली, महिला आरोपी कल्पना मारुतराव बखाल, वय-३० वर्ष, रा-बाबर सोळंकी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर-४०२ ए विंगए दत्त नगर, दिघी पुणे, श्रावण एकनाथ शिंदे, वय-३२ वर्षे, रा. फ्लैट नंबर-४ लिमकर बिल्डींग, अजमेरा सोसायटी जवळ, तुकाराम नगर, वाघोली यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
या आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपी २ याने बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपार्टमेंट लेटर) देवुन तसेच आरोपी यांनी आरोपी अनुदिप शर्मा याची बनावट कंपनी असल्याचे माहित असुनही फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदारांची आयटी कंपनीत नोकरीला लावतो असे सांगुन लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे हे करत आहे, अशा प्रकारे वरील आरोपीकडून नोकरीला लावतो असे सांगुन अधिक कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट- पिंपरी चिंचवड यांना संपर्क करावा.
सदरची कारवाई पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने सो यांचे मार्गदर्शना खालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, दादा पवार, पोहवा/ प्रविण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा/नागेश माळी, पोशि/पोपट हुलगे यांनी केली आहे.