न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- हिंजवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सुर्यदत्ता कॉलेज बावधन येथे विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरीक सहाय्यता मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. सदाबहार सिनियर्स संघाच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वागतगीत सादर केले. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज पाहणारे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र होणराव यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाबाबतच्या कामकाज कायदयाविषयी पी.पी.टी.द्वारे माहिती दिली.
तसेच ज्येष्ठ नागरीकांची सायबर फसवणुक होण्यापासून कसे सावध रहावे याबाबत सहा. पोलीस निरीक्षक पानमंद यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी प्रस्ताविकात ज्येष्ठ नागरिकापैकी ऐकटे/दुकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती देवून त्यांची देखभाल करण्याकरीता प्रत्येकी १ अंमलदार यांची नेमणूक करून काही समस्या अथवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ संबंधीत अमलदार यांच्याशी संपर्क करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेवून पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या शंकाचे समाधन केले. ज्येष्ठ नागरिकांशी पोलीसांचा ऋणानुबंध निर्माण करीत ज्येष्ठ नागरिकांशी कायम संपर्कात राहुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच्या उपक्रमास ज्येष्ठानुबंध असे नाव देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
पोलीस आयुक्त यांनी ज्येष्ठ नागरीकांना येणा-या दैनंदीन समस्या व त्या निवारण्यासाठी पोलीसांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ‘ज्येष्ठानुबंध’ या उपक्रमाचे महत्व त्यांनी विशद करून सांगितले. असाच उपक्रम पुर्ण आयुक्तालय हद्दीत लवकरच राबविणार असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाकरीता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग, डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, ज्येष्ठ नागरीक कक्ष पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होणराव संजय बी. चोरडीया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस बावधन, सुषमा चोरडीया, किरण दगडे, नगरसेवक, दिलीप वेडे पाटील नगरसेवक, नीलकंठ बजाज, अध्यक्ष, सदाबहार सिनिअर्स संघ बावधन व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये हिंजवडी पोलीस ठाणेचे परिसरातील सुमारे २०० ते २२५ जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सदर ज्येष्ठ नागरिक सहाय्यता मेळावा कार्यक्रम सुत्रसंचालन आर.जे. अक्षय यानी केले, डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे यांनी आभार प्रदर्शन केले.