न्यूज पीसीएमसी नेटवर्क
औंध प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज हडपसरचे विद्यमान प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले यांना ग्लोबल इंटरनॅशनल अससोसिएशनचा ‘फेलो ऑफ. इंटरनॅशनल अससोसिएशन सायन्स इम्पॅक्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य, डॉ. अरविंद बुरुंगले यांनी विज्ञान विषयात दिलेले योगदान, संशोधनात केलेली उत्तम कामगिरी, प्रभावी अध्यापन प्रणालीसाठी केलेले प्रयत्न, सहकार्यांना सातत्याने काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा, नाविन्याचा ध्यास, शिक्षण क्षेत्रात आधुनिक झालेले बदल स्वीकारून सर्जनशील वृत्तीने सातत्यपूर्ण कार्याबद्दल प्राचार्य, डॉ. अरविंद बुरुंगले हे या वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
याकरिता त्यांना “ग्लोबल इंटरनॅशनल अससोसिएशनचा फेलो ऑफ. इंटरनॅशनल अससोसिएशन सायन्स इम्पॅक्ट” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्रिं. डॉ.विजयसिंह सावंत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या…















