- शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील वाल्हेकर वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भरत शंकर वाल्हेकर हे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची विविध कामे करीत आहेत. वाल्हेकरवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून हा प्रश्न नागरिकांच्या अत्यंत गरजेचा जिव्हाळ्याचा असून याकडे पूर्णपणे लोकप्रतिनिधींचे कायमच दुर्लक्ष झाले आहे.
वाल्हेकरवाडी आणि परिसरामध्ये एकूण लोकसंख्या २५००० च्या आसपास असून स्थानिक रहिवाशांना स्मशानभूमीची प्रचंड अडचण होत आहे. वाल्हेकरवाडी आणि रावेतच्या शिवेवर स.नं. २०२ मध्ये स्मशानभूमीचे काम चालू झाले होते. त्या बांधकामाचा कालावधी संपून गेला आहे. अनेक वेळा त्या कामासाठी मुदतवाढ पण दिलेली आहे. तरी ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
एखाद्याचे निधन झाले तर विविध ठिकाणी अंत्यविधीसाठी जावे लागते. वाल्हेकर वाडीत त्वरित स्मशानभूमी बांधून द्यावी, असे निवेदन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत शंकर वाल्हेकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.














