न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२३) :- महेक टेलर्स या दुकानातील टेलरने फिर्यादी यांच्या दहा वर्षांच्या मुलीला शिवलेला ड्रेस देतो म्हणून दुकानातील आतल्या बाजूस नेले. तिथे तिच्या बरोबर अश्लील हरकत केली. त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढुन तीचा विनयभंग केला.
ही घटना (दि. ८) रोजी सायंकाळी ७.१० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या बिल्डींगच्या समोर पिंपळे गुरवमध्ये घडली. महिला फिर्यादीने आरोपी सनवर मोहरम शाह (वय २८ वर्षे, धंदा टेलर, रा. राजीवगांधी झोपडपट्टी, खडकी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३१८/२०२३. भा. दं. वि. कलम ३५४, ३५४(अ), लैगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८.१२. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.