न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२३) :- आपसात संगणमत करून फिर्यादीला जमीन मिळकत आरोपी शेतकरी महिलेकडून खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, त्या व्यवहारापोटी शेतक-याच्या वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेवुन, त्या सह्यांचा कायदेशिर कामकाजासाठी वापर केला.
खोटे दस्तऐवज तयार करून फिर्यादी यांनी व्यवहारापोटी दिलेले १,३६,९८,००० रूपयांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहर केला. ही घटना सन २०२२ ते दि. ०४/०४/२०२३ दरम्यान खराळवाडी, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी जयवीर अमरबहादूर यादव यांनी आरोपी विशाल माणिक राऊत (वय अंदाजे ३० वर्षे रा. रो हाऊस स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण), माणिक देवराम राऊत (वय अंदाजे ६२ वर्षे, रा. सदर), महीला आरोपी (वय अंदाजे २७ वर्षे, रा. सदर), महीला आरोपी (वय अंदाजे ५५ वर्षे, रा. सदर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ७०७/२०२३, भादंवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.