न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ मार्च) :- राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी घमासान चांगलेच रंगात आले आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपने सत्तेत असूनही एकमेकांवर अनेक मुक्ताफळे उधळली होती. नेमक्या त्याच मुक्ताफळांची आठवण करून देत विरोधकांनी हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनीच केलेल्या वक्तव्याचा वाग्बाण सोडत बोचरी टीका केली. ते म्हणाले, की अशा कोणत्या ‘ईडी’पीडा आल्या आहेत, अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी का आली? ट्विटरवरून मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभुमीवर धनंजय मुंडे यांनी टीका केली .










