न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- महापालिकेकडून अनधिकृत होर्डिग्ज खांब निष्कासन कारवाई करण्यात येत आहे. भूमकर चौकाच्या बाजूला सर्विस रोडच्या भिंतीवर २५ लोखंडी खांब उभे केले होते.
हे खांब अनधिकृत असल्याचे निदर्शनास येताच महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे, ड क्षेत्रीय अधिकारी किरण मोरे, कार्यालय अधिक्षक तुकाराम जाधव, अभियंता अविनाश चव्हाण यांनी आज त्वरित पाहणी करून लोखंडी खांब काढून टाकण्याची कारवाई केली. याबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.














