न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- आकुर्डी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने लिफ्टची तरतूद केली आहे. त्यानुसार लिफ्ट बांधणीचे काम सुरू आहे. लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट सुरू होईल, अशी माहिती स्थानक प्रबंधकांनी दिली.
शहरात कुठल्याच स्थानकावर लिफ्टची सेवा नाही. सर्वात सुंदर म्हणून आकुर्डी स्थानकाचा गौरव रेल्वे प्रशासनाने केला आहे. यामध्ये आणखी भर म्हणून येथे लिफ्टची बांधणी होणार आहे.














