- साई ऑर्चड सोसायटीचा परिसर हिरवा करण्याचा संकल्प; उन्नतीच्या वतीने वृक्षारोपण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील साई ऑर्चड सोसायटीत उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे व संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सोसायटीमधील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहीमेत सहभाग घेतला. सोसायटीच्या परिसरात विविध प्रकाराच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यातून परिसर हिरवा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, संस्थापक संजय भिसे, सोसायटीचे चेअरमन राजकुमार शर्मा, सेक्रेटरी अमित कोरे, खजिनदार योगेश सामंत, निलेश अग्रवाल, दत्ताञय बनसोडे, हरीमोहन तिवारी, विपुल जोशी, कपिल पंडीता, कलपेश रमानी, रिना रमानी, सुहास सतर्के, स्मिता सतर्के, राधेशाम अग्रवाल, मिना अग्रवाल, भास्कर कुलकर्णी, विजया कुलकर्णी, आण्णा शिंदे, अपुर्वा जोशी, शरद नायर, सरिता नायर, भारती रंजन, स्मिता बनसोडे, निलम शर्मा, डाॕ.डी.सी.नाईक, व्ही जयलश्मी, राव काकु, जाधव. संदेश भोसले,.अनंता बोरा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. अचानक हवामान बदलत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा आणि पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत आहे. पुढील पिढीला ही समस्या भेडसावू नये या उद्देशाने सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड मोहीमेत सहभाग घेतला. यापुढेही परिसरात वृक्षारोपण मोहीम सुरूच राहणार आहे, अशी माहिती डॉ. कुंदाताई भिसे यांनी दिली.














