न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचालित प्रतिभा महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने त्रिदशकपूर्ती सोहळा आणि पुणे जिल्हास्तरीय मेळावा प्रतिमा महाविद्यालयात पार पडला. त्याचे उद्घाटन आणि चे भारत विठ्ठलदास यांच्या विज्ञानाच्या प्रयोगाने पाण्याने दिवा प्रज्वलन करून उद्योजक संजय खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हास्तरीय मेळाव्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व मानसोपचार तज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर यांचे प्रेम मैत्री आणि नकाराचा स्वीकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अंधश्रद्धा निर्मूलना करिता प्रदीर्घ सेवा करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर गौरव पुरस्कार राजीव जाधव निर्मला सोळंकी यांना सोनज सेवा प्रबोधनीतर्फे स्मृतीचिन्ह स्वरूपात डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विविध शाळांमधील सोळा विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक स्वरूपात ग्रंथ दिंडी प्रेरणा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी विचार मंचावर पुणे जिल्हा अंनिसचे अध्यक्ष डॉ राजेंद्र कांकरिया, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी मिलिंद देशमुख नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, श्रीराम नलावडे, विजय सुर्वे विश्वास पेंडसे, प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना च्या प्रमुख प्रा.आश्लेषा देवळे, प्रा सुखलाल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानात मानसोपचार तज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर म्हणाले, आपल्याला प्रेम मैत्री आकर्षण या तिन्ही गोष्टीचे अचूक आकलन करता आले पाहिजे. महाराष्ट्रात पुणे शहरात अनेक अप्रिय घटना घडल्या खून कोयता ग्यांग, जीव घेणा हल्ला, महिला स्त्रियांचे शोषणाला बळी पडण्याचे वाढते प्रकाराला
आळा बसण्यासाठी अंनिसमार्फत अभियान चालवण्यात येत आहे समाजात हिंसा करणारे स्त्री पुरुष दोघेही असू शकतात प्रेमात पडण्याचे कमी वयात प्रकरणे वाढत आहेत. मोबाईलचा वापर आज प्रत्येक जण करीत आहे फेसबुक युट्युब वर कोणते चित्र येईल याची कोणी खात्री देऊ शकतो का?
असा सवाल करून प्रेम लग्न लैंगिकता आपल्यापर्यंत झपाट्याने पोहोचतात त्याची शास्त्रीय माहिती मात्र कोणी देताना दिसत नाही विद्यार्थी आपल्या आई-वडील शिक्षकांना विचारू शकतात का असे विचारून विद्यार्थी सोशल मीडिया जिवलग मित्राकडून माहिती उपलब्ध करून घेतात वयात येणे हेही नैसर्गिक असले तरी त्यांना अनेक भावना येतात परंतु लग्न मात्र उशिरा करतात लक्षात ठेवा आकर्षण नैसर्गिक आहे भावना मनात निर्माण झाल्यावर विद्यार्थ्यांनी पालकांबरोबर मन मोकळेपणाने चर्चा करा प्रेम आकर्षणाबाबत सगळ्या बाबीचा विचार केला पाहिजे. आजही कांद्या पोह्यावर लग्ने ठरवली जातात, ज्योतिष कुंडली बघतात.
आकर्षण बाह्य गोष्टीवर अवलंबून असते लग्नाचा किंवा प्रेमाचा जोडीदार बाह्य रूपाचा असलेला निवडणार का? यासाठी प्रेम आकर्षणाबाबत सगळ्या बाबीचा विचार केला गेला पाहिजे. प्रेम मैत्री लग्न हा दोघांच्या मधील करार आहे आज लग्नानंतर सोडचिठ्ठी चे प्रकार वाढत आहे एका द्दष्टीने चांगली गोष्ट आहे कारण त्रासदायक नात्यापासून सुटका करून स्वतःच्या पायावर उभे राहता येते. अधिकाराचे आदान-प्रदान स्त्री-पुरुषांच्या बरोबरीचे असले पाहिजे.
आज समाजात फिरायचे एका बरोबर लग्न दुसऱ्याबरोबर ,एकतर्फी प्रेम असता कामा नये. तू हा कर या ना कर हे आदर्श विद्यार्थ्यांनी होकार नकाराबाबत खिलाडू वृत्ती अंगीकारली पाहिजे. कोणीही आपले दुर्गुण दाखवीत नाही चांगले वाईट दोन्ही गुण प्रत्येकाला असतात. परस्परात प्रेम असल्याशिवाय विवाह टिकू शकत नाही. खरं प्रेम त्याग, सहवासातूनच निर्माण होते जे त्याच्या दैनंदिन वागण्या बोलण्यावर अवलंबून असते यासाठी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. आयुष्यात प्रत्येकाला समझोता करता आला पाहिजे हवी असलेली गोष्ट नाही मिळाली तरी खेचून घेण्याची प्रवृत्ती आज समाजात वाढत आहे मोबाईल मध्ये चुकीचे पोस्ट टाकणे, अडवून मारहाण करणे दमदाटी करणे हे टाळण्यासाठी मुला मुलींनी एकमेकांना दिलेल्या नकार पचविता आला पाहिजे आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे.
प्रास्ताविकात मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र कांकरिया यांनी पिंपरी चिंचवड शाखेच्या मागील 30 वर्षातील कामाचा आढावा सांगितला तसेच सोनज सेवा प्रबोधनीत तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या मागची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करताना स्वतःचे आरोग्य कौटुंबिक जबाबदारी सांभाळून लोकाभिमुख कामातूनच कार्यकर्ता बनतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनाच्या प्रमुख प्रा. आश्लेषा देवळे यांनी केले.














