- ड्युटीवरील पोलिसांना ठार मारण्याचा केला प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- ‘डांगे चौकातील फेड बँक येथे चोरी होत आहे. मदत हवी आहे’. असा कॉल पोलीस मार्शल यांना डयुटीस असताना प्राप्त झाला. दरम्यान पोलिस आणि त्यांचे सहकारी हे बँक असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर गेले. तेव्हा ऑफिस शटरचा कोयंडा तोडुन उचकलेला त्यांना दिसला. शटर वर घेवुन सावधपणे आत प्रवेश करुन पाहणी करत असताना, भिंतीला होल पाडुन भिंत फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसला. ते पाहत असताना अचानकपणे ८ लोक हातामध्ये हत्यारे घेवुन पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावुन आले.
पोलिसांनी प्रतिकार केला. त्यांच्या पैकी चार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांच्या कडील हत्यारे हिसकावुन घेतली. पळुन गेलेल्या दोघांनी इमारतीवरुन शेजारील पत्र्यावर उडी घेतली. ताब्यातील आरोपींकडे प्राथमिक विचारपुस करताना सर्वजण फेड बँकेत दरोडा घालून त्यातील सोने चोरी करून नेणार होते. कोणीही अडवल्यास त्यास ठार करण्यासाठी कोयता, सत्तुर हे हत्यार सोबत ठेवले असल्याचे त्यांनी सांगीतले.
हा प्रकार (दि. ९) रोजी रात्री १.२८ ते १.४५ च्या दरम्यान फेड बँक, गणपती मंदीर जवळ, डांगे चौक, थेरगांव येथे घडला. वाकड पोलिसांनी ६५१/२०२३ भा.द.वि. कलम ३९५.३९८, ३०७,३५३, ४५८, ५११ भारतीय हत्यार कायदा ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपी मोनीउर खुर्शिद शेख (वय ४४ वर्षे रा. साबु सिद्दीकी रोड, मुसाफिरखाना, सहारा मार्केटजवळ, मुंबई), जावेद अख्तर शेख (वय ३४ वर्षे रा. संदरपुर, पो. पीरपैंती, जि. भागलपुर, बिहार), हासीम फेजुदिन शेख (वय ३२ वर्षे रा. भाजीमार्केट जवळ, हडपसर, पुणे मुळ रा. उत्तर पलाशगाछी, ग्राम बट्टी टोला, पो. डकेत टोला, थाना राधानगर, जि. साहेबगंज), शाहिद सिकंदर शेख (वय ४० वर्षे रा. सुरत गल्ली जवळ, लोखंडवाला ब्रिजवाली, हैद्राबाद इस्टेट जवळ, मजीद बंदर, मुंबई. मुळ रा. पाचुटोला, पो. नारायणपुर, थाना राजमहल, जि. साहेबगंज, झारखंड), नाबीर शेख (मानसिंगा, पो. नारायणपुर थाना राजमहल, जि. साहेबगंज झारखंड), रहीम शेख (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे), कम्मु, एक नेपाळी अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.