न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- वडापावच्या गाडीवरुन फिर्यादी यांच्या मुलाला आरोपींनी लाथाबुक्याने मारहान केली. त्याला गुप्तपणे व गैरपणे परिरुध्द करण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले. त्याला पिंपळे सौदागरकडे घेवुन गेले. पुन्हा लाथाबुक्यानी मारहान करुन त्याला काही वेळानंतर पिंपरी पोलीस स्टेशन येथे घेवुन आले.
ही घटना (दि. ९) रोजी दुपारी १.३० वाजता समृध्दी हॉटेलच्या बाजुला, म्हाडा शेजारी, पिंपरीगाव येथे घडली. फिर्यादीने आरोपी योगेश राजेद्र जगताप, राहुल तुकाराम जगताप, अमित तुकाराम जगताप, विजय चंद्रकांत माने यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ७१२/२०२३ भादवी कलम ३६३, ३६५, ३२३, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.














