न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर केला. वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले. ते सिद्ध झाल्याने आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर करण्यात आला होता. या गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारीत केलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, गुरजि. नं. २४७ / २०२३ भादंवि कलम ३९५ ३५४, ३५४ (ब). आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो.का. ३७ (१) (३) १३५ सह, क्रि. लॉ अॅ. अॅक्ट कलम ७ या तपासासमध्ये आरोपी जय उर्फ किटक प्रविण भालेराव, (टोळी प्रमुख) वय १९ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे, पुणे, व इतर ०५ यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे. गंभीर दुखापत, दुखापत विनयभंग, खंडणी मागणे, बेकायदेशीरपणे हत्यार तसेच अग्निशस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवुन खुनाचा प्रयत्न करणे व तोडफोड करणे, असे एकुण १३ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत दाखल आहेत.
रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १९०/२०२३ भादवि. ३९२, ३४, ४११ च्या तपासासमध्ये आरोपी रामा परशुराम पाटील, (टोळी प्रमुख) (वय-२९ वर्षे, रा. शिवशंभो बिल्डींग, जय मल्हार कॉलनी नं. ०६, थेरगाव) व इतर ०२ यांच्याविरुध्द गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमवुन सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे/ हत्यार जवळ बाळगणे, चोरी करणे, चोरीचा माल घेणे, असे एकुण ०९ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, स्वप्ना गोरे पोलीस उप-आयुक्त (ग), काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त परिमंडल-२, बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत पी.सी.बी गुन्हे शाखा, सत्यवान माने, व.पो.नि. तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे, शिवाजी गवारे, व.पो.नि. रावेत पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.हवा. अमित गायकवाड, रावेत पोलीस ठाणे, पो.शि. विकास तारू, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.














