- अपमानास्पद वागणूक दिल्याने मुलानेच काढला काटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- रुपीनगर चिखली येथील राजमाता जिजाऊ हौ. सोसा. येथे दुपारच्या सत्रात घरी कोणीही नसताना अज्ञात इसमाने एका महिलेचा डोक्यात जड वस्तुच्या सहाय्याने मारहान करून खुन केला होता. या खुनाबाबत चिखली पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ४२१ / २०२३ भादंवि कलम ३०२,४५५ अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ च्या दोन वेगवेगळ्या टिम करीत होत्या. दरम्यान तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेजेस, स्थानिक तपास, गोपनीय माहिती या सर्व तपासाच्या माहितीचे विश्लेषण करून मयत महिला हिचा खुन हा तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाने केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
तपासात मिळालेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी मयत आजीचा मुलगा हे त्याचे वडीलांचे मित्र असल्याने तो त्याच्या घरात गेला असता त्याला मयत आजीने धक्काबुक्की व अपमान करून घराबाहेर काढले होते. त्यामुळे तेथे राहणा-या लोकांसमोर व महिलांसमोर त्याचा अपमान झाल्याने त्याचा राग मनात होता. त्यानुसार घरी कोणी नसताना त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारुन खुन केला आहे. आरोपी मुलगा हा विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ मोहाडे, मनोजकुमार कमले फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रूपनवर, प्रमोद गजे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांनी केली आहे.














