- तीन गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- व्यावसायीक भागीदाराच्या खुनाचा कट रचणाऱ्या सनदी लेखपालास पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे झालेल्या किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या खुनाच्या कटाचा तपास सुरु असतानाच पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सोमाटणे फाट्याजवळ (दि. ३) रोजी आरोपी सुधीर अनिल परदेशी (वय २५ वर्षे, रा. साई धाम सोसायटी, केशवनगर, वडगाव मावळ) याला दोन गावठी पिस्टल व १६ जिवंत काडतुसे (राऊण्ड) सह ताब्यात घेतले. त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर होवुन पुढील तपास दरोडा विरोधी पथकामार्फत सुरु होता.
गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी सुधिर परदेशी याने त्याचा साथिदार आरोपी शरद साळवी याच्या मार्फत मध्यप्रदेश राज्यातुन ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे आणल्याचे सांगितले. त्यापैकी ०१ पिस्टल व २४ राउण्ड हे आरोपी Chartered accountant (CA) याने स्वतःकडे ठेवल्याचे सांगितले. त्या CA चा शोध घेतला असता तो चिंचवड येथे त्याच्या राहत्या घरी मिळुन आला. त्याच्याकडे ०१ पिस्टल व २४ राऊण्ड मिळुन आले. CA विवेक नंदकिशोर लाहोटी (वय ४२ वर्षे व्यवसाय सनदी लेखपाल, रा ए. १/२ एच.डी.एफ.सी. कॉलनी, शाहुनगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलीस कोठडी दरम्यान CA विवेक लाहोटीने आरोपी सुधिर परदेशी व शरद साळवी या सराईत गुन्हेगारांना ५० लाख रुपयांची राजु माळी यास मारण्याची सुपारी दिली होती. त्याबाबत पुरावे मिळाले आहे. अटक आरोपी सुधिर परदेशी हा पोलीस अभिलेखा वरील गंभिर गुन्हे करणारा गुन्हेगार असल्याने त्याचा एका प्रतिष्ठीत सनदी लेखपालाशी कसा काय संबंध आला तसेच त्याने त्याचेकडे अग्नीशस्त्रे कशी काय ठेवली असावी ही बाब संशयास्पद वाटत होती. त्यामुळे सदर दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान कसून तपास केला असता सनदी लेखपाल विवेक लाहोटी याचा जमिन खरेदी विक्रीच्या व्यवसायातील भागीदार असलेला इसम राजु माळी (रा. सोमाटणे फाटा, मावळ) याच्या सोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतुन सनदी लेखपाल याने त्याची जवळची मैत्रिण एक महिला हिचे मार्फतीने आरोपी सुधिर परदेशी यास ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात राजु माळी याचा खुन करण्याची सुपारी दिली असल्याचे व त्याच कामासाठी सदरची अग्नीशस्त्रे आणल्याची निष्पन्न झाले. त्यामुळे सदर गुन्हयामध्ये महिलेस देखील अटक करण्यात आली आहे.
यातील इसम राजु माळी हे दर शनिवार व रविवार सातारा जिल्यातील त्याच्या बांधकाम साईट येथे भेट देवुन तेथेच मुक्काम करतात ही बाब हेरुन सदर आरोपींनी त्याच ठिकाणी सदर खुनाचा कट अमलात आणण्याचे ठरविले होते. त्या ठिकाणी रेकी करण्यासाठी भेटी दिल्या होत्या. त्यांनी कट आमलात आणण्याकरीता सदरचे ठिकाण निवडले. कारण त्या ठिकाणी काही प्रकार घडल्यास पोलीसांना लवकर सुगावा लागनार नाही. सदर गुन्हयाचा पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख हे करीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, सतिश माने सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, समिर रासकर, सुमित देवकर, महेश खांडे, सागर शेडगे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, नितीन लोखंडे चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे.














