- प्रवासी भाड्याच्या कारणावरुन प्रवाशाला बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- भोसरी येथील नाशिक फाटा बसस्टॉपवर फिर्यादी त्यांच्या चुलत भावांना सोडण्यासाठी आले होते. तिथे फिर्यादीला खाजगी प्रवासी वाहनं भरणाऱ्या आरोपीने प्रवासी भाड्याच्या कारणावरुन फिर्यादीची गचंडी पकडली. आरोपीने त्याच्या साथीदारांना आवाज देवुन बोलावले.
आरोपींनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. लाकडी दांडके पाठीवर, कमरेवर, पायावर मारून त्यांना जखमी केले. तसेच इतर साथीदारांनी छाती, पोटात, लाथा बुक्कयांनी मारहाण केली. फिर्यादीच्या चुलत भावांचे काहीही न ऐकता आरोपीसह साथीदारांनी फिर्यादीच्या खिशातील १३०० रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेत पळुन गेले.
फिर्यादी सुनिल भगवान शेळके (ड्रायव्हर रा. पत्राशेड मिलिंदनगर, पिंपरी) यांनी आरोपी अनिल (वय ३० वर्ष अंदाजे पुर्ण नाव माहीत नाही), सचिन (वय ३० ते ३५ वर्ष अंदाजे पुर्ण नाव माहीत नाही), गणेश (वय ३० ते ३५ वर्ष अंदाजे पुर्ण नाव माहीत नाही), एक अनोळखी इसम (३० ते ३५ वर्ष अंदाजे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ५९७/२०२३भा.द.वि. कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














