न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- नात्याने भाऊ आणि भावजय हे फिर्यादी व आरोपी आहेत. जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून आरोपी दोघा भावांनी फिर्यादीच्या आईला भांडण काढून शिवीगाळ केली. फिर्यादी हे तेथे गेलो असता भाऊ आरोपी याने विळा फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन व भावजय आरोपी हिने कुंडी त्यांच्या डाव्या पायावर मारुन फिर्यादीला जखमी केले.
तसेच सह आरोपी हिने पाण्याची स्टिलची बादली फिर्यादीच्या पत्नीच्या पाठीत मारली. हा प्रकार (दि. १०) रोजी १०.३० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी, कुरुळी, गायकवाड वस्ती, ता. खेड, पुणे येथे घडला.
फिर्यादी मंगेश शांताराम गायकवाड (वय ४० वर्षे, रा. कुरूळी) यांनी आरोपी मनोज शांताराम गायकवाड, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३८५ / २०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














