न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- २००७ पासून वापरत असलेला जाण्या येण्याचा रस्ता आरोपींनी बंद केला. रस्ता चालु करायचा असल्यास बेकायदेशिरपणे फिर्यादीकडे पैश्याची / मोबदल्याची मागणी केली आहे.
हा प्रकार (दि.१४/५/२०२३) पासुन गहुंजे येथील फिर्यादीच्या गट नं. १९५, क्रिकेट स्टेडियमजवळ घडला. फिर्यादी सतीश शंकरराव धुमाळ (वय ५० वर्षे, रा. धनकवडी, पुणे) यांनी आरोपी राहुल कुलकर्णी (रा. गहुंजे, ता. मावळ), रमेष कुलकर्णी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३२०/२०२३ भा.द.वि. कलम ३४१, ३४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.














