न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- मागील काही महिन्यांपासुन चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त प्रमाणात वाहन व माल चोरीबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. या अनुषंगाने तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राकेश गुमाने, तसेच पोलीस अमलदार पाहवा साकोरे, पो हवा सावंत, पो हवा शिंदे, पोना राठोड, पोना. सुतार, पौना, पिंजारी, पोना गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. १०) रोजी कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना रात्री १०.०० वाजताच्या सुमारास विवेस्टा सोसायटीच्या कन्सस्ट्रक्शन साईट समोर, फुटपाथवर पुर्णानगर, चिंचवड या ठिकाणी दोन ऑटो रिक्षा अंधारामध्ये संशयीतरित्या पार्क करून तिघेजण ऑटो रिक्षांमध्ये काहीतरी भरत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना आहे त्या स्थितीमध्ये ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली.
प्रथमतः आरोपी हे उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दोन ऑटो रिक्षाची पाहाणी केली. ऑटोरिक्षा व त्यामध्ये लोखंडाचे मटेरीयल होते. चिखली पोलीस ठाण्यात त्याविषयी गुन्हा क्र. ४३० / २०२३ भादंवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली रुपये २,५०,००० किमतीची एक नवी रिक्षा, गुन्हा क्र. ४३१ / २०२३ भादंवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली रुपये ५०,००० किंमतीची एक रिक्क्षा, गुन्हा क्र. ४३२ / २०२३ भादंवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली १,३०,०००/- रु. किं.चा मुददेमाल असा एकुण ४,३०,०००/- रुपये किंमतीचा एकुण मुददेमाल ताब्यात घेवुन एकुण तिन गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
दिगंबर काशिनाथ जामदारे (वय १९ वर्ष, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली), प्रतिक गुलाब गोडसे (वय २० वर्ष, रा. घरकुल, चिखली), वैभव संजय कापरे (वय १९ वर्ष, रा. नेवाळे वस्ती, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोहवा. १९३३ / साकोरे, पो हवा / ८०३ सावंत, पो हवा / ७०९ शिंदे, पोना ९६२ / राठोड, पोना. १८१३ / सुतार, पोना. १८५६ / पिंजारी, पोना. १५४६ / गायकवाड या पथकाने केली आहे.