न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- रूपीनगर, तळवडे मुख्य बाजारपेठेतील “मातोश्री गारमेंट” या कपड्याच्या दुकानात (दि. ८) रोजी सहाजण घुसले. त्यांनी कोयत्याने दुकानाची तोडफोड केली. दुकानदारास जिवे मारण्याच्या प्रयत्न करून पळून गेले. तसेच जाताना रुपीनगरमधील मुख्य बाजापेठेच्या रस्त्यावर आरडा ओरड करत कोयते फिरवत रस्त्यावर पार्क असलेल्या चार चाकी व दुचाकींची तोडफोड करून परीसरात दहशत निर्माण केली होती.
याप्रकरणी दुकानमालकाच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात ४२८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३३७, ४२७, ३४, आर्म अॅक्ट कलम ४(२५) व म.पो. का. अधि. कलम ३७ (१) (३) तसेच क्रिमिनल अमेमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिखली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चिखली, ओटास्किम, निगडी, आकुर्डी, पिंपरी, भोसरी परीसरात फुटेजमधील फ़ोटो व्हायरल करून आरोपींची ओळख पटविण्यात यश मिळवले.
रामेश्वर धनराज कांबळे (वय १९ वर्ष, रा. औटास्किम, निगडी), विलन ऊर्फ शुभम गजानन खवडे (वय १९ वर्षे, रा. रुपीनगर, तळवडे), आदित्य गोरख दुनघव (वय १९ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी), गणेश परमेश्वर उबाळे (वय १८ वर्षे, रा. ओटास्किम, निगडी), ओंकार शहाजी चंदनशिव (वय २० वर्ष रा सहयोगनगर, रुपीनगर, तळवडे), विशाल शंकर वैरागे (वय १९ वर्ष रा. ओटा स्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपासात ४ आरोपी हे अल्पवयीन असल्यापासून गंभीर गुन्हे करत असल्याचे व अल्पवयीन असल्याने त्याना कायद्याने अभय मिळालेले असल्याने त्यांना कायद्याची भिती नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. अटक आरोपींना त्यांनी गुन्हा केलेल्या ठिकाणी तपासात नेले असता परीसरातील नागरिकांनी पोलीस कामगिरीबाबत समाधान व्यक्त करुन पोलीसांचा सत्कार केला. अटक आरोपी हे सद्यस्थितीत प्रोढ असल्याने त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडुन नागरिकांना देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्ग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोहवा. १९३३ / साकोरे, पो हवा/८०३ सावंत, पो हवा ७०९ शिंदे, पौना. ९६२ / राठोड, पोना. १८१३ / सुतार, पोना. १८५६ / पिंजारी, पोना. १५४६/ गायकवाड, पोशि/ ३३८९ भोर या पथकाने केली आहे.














