न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :- दरोडा टाकण्याची तयारी करीत असतानाच (दि. १५) रोजी पहाटे २.०० च्या सुमारास जगताप डेअरी चौक, सांगवीकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर, रहाटणी येथे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी व विधिसंघार्शिताकडून २०० ची लोखंडी तलवार, २०० चे दोन लोखंडी कोयता, एका प्लस्टिकच्या पिशवीमध्ये मिरची पुड, ५००० किमतीचा ग्रे रंगाचा रेडमी कंपनीचा १० प्राईम मॉडेल असलेला मोबाईल हॅण्डसेट, ५०० चा काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा बटनाचा मोबाईल हॅण्डसेट, १५००० ची एक होंडा कंपनीची डीओ स्कुटी असा एकूण २०९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वेंकटेश सुरेश नाईक (वय २४ वर्षे, रा. राजवाडेनगर, जयहिंद कॉलनी, काळेवाडी), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३ वर्षे, रा.ओमकार कॉलनी, नढे नगर, म्हस्के यांचे भाडयाचे खोलीत, काळेवाडी), शेखर काळुराम जावुरे (वय १९ वर्ष, रा.भारत कॉलनी, शेख यांचे भाडयाचे खोलीत, नढे नगर, काळेवाडी), विधिसंघर्ष बालक, एक अनोळखी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकड पोस्टेमध्ये ६६६/२०२३ भा.द.वि.क.३९९, ४०२, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.