न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- पिंपरीतील नवीन कोर्ट आवारात पिंपरी- चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ व कार्यकारिणी मार्फत जागतिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण सोहळा पार पडला.
कार्यक्रमास नेहरूनगर पिंपरी कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, तसेच सह न्यायाधीश आर. एम. गिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वृक्षारोपण प्रसंगी पिंपरी- चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशच्या उपाध्यक्षा अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, सहसचिव अॅड. मंगेश नढे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. सौरभ जगताप, अॅड. अक्षय केदार, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड. नितिन पवार तसेच मा. अध्यक्ष अॅड. विलास कुटे, अॅड. सुदाम साने, अॅड. राजेश पुणेकर,अॅड. गौरव वाळुंज, अॅड. पूनम राऊत, अॅड. संगीता कुसाळकर, अॅड. सुषमा बोरसे, अॅड. चित्रा फुगे, अॅड. काळभोर, नायर, लोढा व इतर वकील बंधू भगिनी उपस्थित होते.
बार असोसिएशन तर्फे न्यायाधीश वर्ग यांचा फुलांच्या कुंड्या देऊन सत्कार करण्यात आल. तसेच बहुगुणी अशी कडुनिंबाची झाडे लावण्यात आली.

















