न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- आपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी चेतन गौतम बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष स्थापनेपासूनच संघटनेत काम करणारे बेंद्रे यांच्याकडे शहराच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार होता.
राज्यभरात आम आदमी पार्टीच्या संघटन विस्तार कार्यक्रमाअंतर्गत पक्षाचे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव अजित फाटके यांनी जिल्हानिहाय नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात गौतम बेंद्रे यांचाही समावेश आहे.
आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवडमधील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढत असताना शहरामध्ये पार्टीचे संघटन मजबूत करून येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना राजकारणातील स्वच्छ पर्याय देणार असल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.


















