न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२३) :- पावसाळ्यात वीज अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. धोकादायक वीज यंत्रणेबाबत व्हॉटस्अॅप क्रमांकावर फोटो पाठवून महावितरणकडे तक्रार दाखल करता येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहर आणि हवेली तालुक्यासाठी ७८७५७६६७१२३ हा व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आला आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या वीज यंत्रणेचा फोटो व पत्ता या क्रमांकावर पाठविण्याचे अवाहन महावितरणने केले आहे.
कॉल करण्याऐवजी ती माहिती व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे पाठवावी. काही वेळेला अनेक ठिकाणच्या फ्यूज, पेट्यांचे झाकण उघडे व तुटलेले असते. वीज तार तुटलेली असते. जादा झोल पडलेला असतो. अशा तक्रारी देता येणे शक्य झाले आहे.
महावितरणच्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००- २३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावरदेखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.















