न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२३) :- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिम्मित निगडी शक्ती भक्ती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अभिषेक चक्रनारायण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अभिषेक चक्रनारायण यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना असे मत व्यक्त केले कि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना तत्कालीन परिस्थिती मुळे शिक्षण घेत आले नाही परंतु ते परिस्थितीला शरण न जाता त्यांनी मेहनत घेऊन ते स्वतः साक्षर झाले व त्यांनी जगातील उत्तम अश्या साहित्याची निर्मिती केली. व जगभर नावलौकिक मिळवला आजच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ यांच्या या जीवनसंघर्षाचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,सचिव अजय चक्रनारायण, समन्वयक प्रतिभा बनसोडे,समन्वयक माधवी खरात उपस्थित होते.











