न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका कार्यालयात मद्यपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातील दोषी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या एका कार्यालयात रात्रीच्या वेळेत कर्मचारी मद्यपान करीत होते. ती बाब तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्हीची पिन काढण्यात येत होती. त्यामुळे कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण बंद होत होते.
मद्यपानाचा तो व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन संबंधित सुरक्षारक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, अदखलपात्र गुन्हा पोलिसांत नोंदविण्यात आला आहे.















