न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- अज्ञात चोरट्याने फिर्यादी हे झोपलेले असताना उघड्या दरवाज्यावाटे घरामध्ये प्रवेश केला. फिर्यादीच्या राहत्या घरामध्ये ठेवलेले १,४०,००० रुपये किंमतीचे एकुण ०३ मोबाईल व ०६ लॅपटॉप तसेच आणखी एकाचा लॅपटॉप बॅग व त्या बॅगमध्ये असलेले त्यांचे लॅपटॉप इश्यु झाल्याचे कागदपत्रे, ऑफीसचे ओळखपत्र आणि दुचाकी गाडीची चावी चोरुन नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ६) च्या सुमारास फिर्यादीच्या घरी, विशालनगर येथे घडला. फिर्यादी वैभव मनीष देशमुख यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी ४०१/२०२३भा.दं.वि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ वाघुले पुढील तपास करीत आहेत.