न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- मोबाईलचा अज्ञात इसमाने इंटरनेटद्वारे अॅक्सेस घेवुन फिर्यादीच्या मोबाईलमधील फोटो व व्हिडीओ डिलीट केले. तसेच फिर्यादीचा सोशल मिडीयाच्या फेसबुक खात्याचा पासवर्ड बदलुन त्याचा अॅक्सेस घेत त्याचा वापर केला.
त्यावर व्हेरीफीकेशनसाठी मोबईल नंबर अॅड केला. तसेच फिर्यादीच्या Gmail खात्याचा पासवर्ड बदलुन त्याचा अॅक्सेस घेत ते खाते दुसऱ्या ठिकाणी लॉग ईन केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १८ /०५/२०२३ ते आजपर्यंत) दिघी येथे घडला. महिला फिर्यादी यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ३५७/२०२३ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३, ६६, ६६ (सी), ६६ (ड) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.