- दहा लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट १ कडून जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- इंडस्ट्रीयल कंपनीमध्ये मोबाईल कंपनीच्या टॉवर पार्टची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली असून १० लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने हस्तगत केला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता.
गुन्हयातील चोरीचा माल भरून जाधववाडी राम मैदानामध्ये टेम्पोसह आरोपी थांबलेले आहेत, अशी पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस पथकाने जाधववाडी, राम मंदिर मैदान परीसरामध्ये सापळा लावुन आरोपी जमीरुल्लाह हकिकुल्लाह सहा (वय ४६ वर्षे, रा. चेतन जाधव यांचे रुममध्ये भाडयाने, वडाचा मळा, जाधववाडी, चिखली) याला पकडले. तेव्हा त्याच्या ताब्यात एक टॅम्पो व टॅम्पोमध्ये मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणारे तीन नविन रेडिमेड टिसीयु बॉक्स असा एकूण १० लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या मालाबाबत अधिक सखोल तपास करता त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणारे तीन नविन रेडिमेड टिसीयु बॉक्स हे त्याने त्याचे तीन साथीदार यांच्यासह धनश्री इंजिनियरींग गोडाऊन, जाधववाडी. चिखली येथील गोडाऊनचे कुलूप तोडुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक शेख, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ जावळे, महादेव जावळे, अजित रूपनवर, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांच्या पथकाने केली आहे.