न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभा निवडणुक पूर्व तयारीसाठी भारतीय जनता पक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठक संपन्न झाली.
पं. नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपल्या सर्वांना पुढील १ वर्ष पूर्ण क्षमतेने काम करायचे आहे. आपणास हे काम मोदीजी अथवा भाजपासाठी नव्हे तर देशासाठी करायचे आहे. सर्व भाजपा सर्व कार्यकर्ते यांना आवश्यक असलेले पाठबळ देणे यासाठी शहराध्यक्ष नव्हे तर पालक म्हणून सर्व क्षमतांनी मी आपल्या सोबत आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर जगताप यांनी भाजपच्या महाविजय अभियानची शहरातील पहिली बैठक पिंपरी विधानसभेत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी नियुक्त सरचिटणीस अनुप मोरे, सचिव तेजस्विनी कदम यांना सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, सचिन पटवर्धन, अनुप मोरे, राजू दुर्गे, विजय शिंनकर, महेंद्र बाविस्कर, सुजाता पालांडे, शीतल शिंदे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा हा संस्कार देणारा पक्ष आहे. बदलत्या राजकीय समीकरण मधे कार्यकर्ते यांनी निराश न होता आपली संघटन शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुजरातमधे अनेक वेळा भाजपाचीच सत्ता का येते कारण तिथे नुसते बूथ प्रमुख काम करत नाहीत तर प्रत्येक पेज वर समिती नियुक्त करून जास्तीत जास्त मतदार करून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण केली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रभारी वर्षा डहाळे यांनी सांगितले.
येणाऱ्या निवडणूकीसाठी पिंपरी विधानसभामधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडणूक आणणे हे आपल्या सर्वांचे उदिष्ट हवे. त्यासाठी भाजपा अंतर्गत सर्व बूथ रचना पूर्ण करणे त्याचप्रमाणे शक्ती केंद्र व बूथ प्रमुख यांना विशेष प्रशिक्षण देणे. या विषयी आपण नियोजन केले पाहिजेत, अशी माहिती निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिली.














