न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात पेन्शनधारकांची बैठक घेण्यात आली.
समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या सूचनेनुसार ९ ऑगस्टला क्रांती दिनी पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, तर १० ऑगस्टला पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत आला.
पेन्शनधारकांच्या मीटिंगला इपीएस १५ राष्ट्रीय समिती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, विजयराज पाठक, पूनम गुजर, अलका मोरे पांडया नाणेकर गोश गोलांदे कुमार कुलकर्णी, बळीराम कातंगळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
हक्काच्या न्याय मागण्यांसाठी विविध स्तरावर आंदोलन करण्याचा निर्धार पेन्शनधारकांनी बैठकीत व्यक्त केला. पेन्शनधारकांना किमान ७५०० पेन्शन, अधिक महागाई भत्ता देण्यात यावा अशी मागणी राजपत यांनी केली.
इपीएस १५ योजनेच्या पेन्शनधारकांना दरमहा किमान ७५०० पेन्शन रुपये देण्यात यावी. वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा. तसेच वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात याव्यात, या मागण्यांसाठी क्रांती दिनी मोर्चा व दुसऱ्या दिवशी उपोषण करण्यात येणार असल्याचे इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पिपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष इंदसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले.